Russia – Ukraine युध्दाला सुरुवात ; रशियाच्या हल्ल्याला 30 देश एकत्रितपणे प्रत्युत्तर देणार

| Updated on: Feb 24, 2022 | 1:52 PM

मागच्या काही दिवसांपासून जी भिती व्यक्त केली जात होती, ती अखेर खरी ठरली आहे. रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर हल्ला (russia ukraine war crisis) केल्याचं वृत्त आहे.

मागच्या काही दिवसांपासून जी भिती व्यक्त केली जात होती, ती अखेर खरी ठरली आहे. रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर हल्ला (russia ukraine war crisis) केल्याचं वृत्त आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज सकाळी लष्करी कारवाईचे म्हणजे युद्धाचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव (Kyiv) आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तेव्हाचं पुतिन कुठल्याही क्षणी युद्ध पुकारू शकतात, हे स्पष्ट झालं होतं. पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर, आता पुढे काय घडू शकतं? युरोपवर, जगावर त्याचे काय परिणाम होतील, या बद्दल मारुफ रझा (Maroof Raza) यांनी आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे. ते डिफेन्स एक्सपर्ट आहेत.

भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!
Russia – Ukraine युध्दाला सुरुवात, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले