VIDEO : खारकीवमधील हादरवणारी दृश्यं! रस्त्यांवर मिसाईलचा मारा, गॅस पाईपलाईनवरही हल्ला

VIDEO : खारकीवमधील हादरवणारी दृश्यं! रस्त्यांवर मिसाईलचा मारा, गॅस पाईपलाईनवरही हल्ला

| Updated on: Feb 27, 2022 | 2:05 PM

रशियन सैन्य युक्रेनमध्ये खोलवर घुसले आहे आणि शहरांमध्ये कहर करत आहे. निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली जात असून, त्यामुळे इमारतींची दुरवस्था झाली आहे. तसेच खारकीवमधील हादरवणारी अनेक दृश्य समोर येताना दिसत आहेत. रस्त्यांवर मिसाईलचा जोरदार मारा सुरू आहे. इतकेच नव्हेतर आता गॅस पाईपलाईनवरही हल्ला करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

गेल्या 4 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, त्यात हजारो सैनिक मारले गेल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. विशेषतः युक्रेनची स्थिती अतिशय वाईट आहे. येथे रशियन (Russian) सैन्य ठिकठिकाणी क्षेपणास्त्रे (Missiles) टाकत आहे, ज्यामुळे लोकांची घरे उद्ध्वस्त (Destroyed) होत आहेत. दोन देशांच्या युद्धात गरीब नागरिक चिरडले जात आहेत. रशियन सैन्य युक्रेनमध्ये खोलवर घुसले आहे आणि शहरांमध्ये कहर करत आहे. निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली जात असून, त्यामुळे इमारतींची दुरवस्था झाली आहे. तसेच खारकीवमधील हादरवणारी अनेक दृश्य समोर येताना दिसत आहेत. रस्त्यांवर मिसाईलचा जोरदार मारा सुरू आहे. इतकेच नव्हेतर आता गॅस पाईपलाईनवरही हल्ला करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

Published on: Feb 27, 2022 02:04 PM