VIDEO : कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवला,परिस्थिती नियत्रंणात- लष्कर प्रमुखांची माहिती Russia Ukraine War

VIDEO : कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवला,परिस्थिती नियत्रंणात- लष्कर प्रमुखांची माहिती Russia Ukraine War

| Updated on: Feb 28, 2022 | 1:09 PM

रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध अधिकाधिक भीषण बनत आहे. मागील पाच दिवसात रशियाने यूक्रेनच्या जवळपास सर्व प्रमुख शहरांवर हल्ला चढवलाय. त्यातच आता रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब हल्ल्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध अधिकाधिक भीषण बनत आहे. मागील पाच दिवसात रशियाने यूक्रेनच्या जवळपास सर्व प्रमुख शहरांवर हल्ला चढवलाय. त्यातच आता रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब हल्ल्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून नवी दिल्लीकडे धाव घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक उच्चस्तरिय बैठक पार पडली. या बैठकीत यूक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली. आता याच संदर्भात एक नवीन बातमी पुढे येते आहे, कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवला आहे. परिस्थिती नियत्रंणात असल्याचे देखील लष्कर प्रमुखांनी सांगितले आहे.

 

 

Published on: Feb 28, 2022 01:08 PM