रशिया युक्रेन विध्वंस सुरुच

रशिया युक्रेन विध्वंस सुरुच

| Updated on: Mar 27, 2022 | 1:15 AM

रशियन सैन्यांकडून आता जमीन, आकाश आणि समुद्रातूनही हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनची राजधानी कीव शहरावर जोरदार हल्ला चढवण्यात आला असून कीवमधून अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. रशियाच्या हल्ल्यात अनेक शहरं उद्धवस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रशियन सैन्यांकडून आता जमीन, आकाश आणि समुद्रातूनही हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनची राजधानी कीव शहरावर जोरदार हल्ला चढवण्यात आला असून कीवमधून अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. रशियाच्या हल्ल्यात अनेक शहरं उद्धवस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यांकडून विविध शासकीय इमारतींसह रहिवासी इमारतींवरही रशियन सैन्याकडून बॉम्बहल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे रशियाविरोधात आता जगभरातून विरोध होत आहे. त्यांनी हल्ले थांबवण्यासाठी अनेक शहरातून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यांवर जळालेल्या गाड्यांचे सांगाडे, यूक्रेनच्या सैन्यानं निकामी केलेले रशियन सैन्याचे रणगाडे आणि अन्य वाहनं, अनेक ठिकाणी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह दिसून येत आहेत.