Special Report | Zelenskyy पळाले, पोलंडला गेल्याचा रशियन मीडियाचा दावा -Tv9

Special Report | Zelenskyy पळाले, पोलंडला गेल्याचा रशियन मीडियाचा दावा -Tv9

| Updated on: Mar 04, 2022 | 10:12 PM

 गेल्या नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. अशातच रशियन मीडियाने केलेल्या दाव्याने खळबळ माजली आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी युक्रेन सोडल्याचा दावा रशियाच्या मीडियाने केला आहे.

Russia Ukraine War : गेल्या नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. अशातच रशियन मीडियाने केलेल्या दाव्याने खळबळ माजली आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी युक्रेन सोडल्याचा दावा रशियाच्या मीडियाने केला आहे. या दाव्यात किती तथ्य आहे? याबाबत स्पष्टता नाही. गेल्या नऊ दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर सत्त हल्ले सुरू आहेत. आपल्या देशाचे नेतृत्व करताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देशातील नागरिकांचे हिरो झाले आहे. अशातच रशियन मीडियाने केलेल्या या दाव्याने युक्रेनियन नागरिक आणि सैन्याच्या मनात संभ्रम निर्माण होऊन परिस्थिती बिघडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा ट्विट करून करण्यात आला आहे.