3 तास Russia चं शिष्टमंडळ Ukraine ची वाट पाहणार – Russia Ukraine War

| Updated on: Feb 27, 2022 | 7:04 PM

शिष्टमंडळात लष्करी अधिकारी आणि इतरांचा समावेश आहे. रशियन शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार आहे आणि आम्ही युक्रेनियन अधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत. विशेष म्हणजे रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि त्याचे सैन्य राजधानी कीवच्या जवळ पोहोचले आहे.

रशियाने म्हटले आहे की युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ बेलारशियन गोमेल शहरात पोहोचले आहे. शिष्टमंडळात लष्करी अधिकारी आणि इतरांचा समावेश आहे. रशियन शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार आहे आणि आम्ही युक्रेनियन अधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत. विशेष म्हणजे रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि त्याचे सैन्य राजधानी कीवच्या जवळ पोहोचले आहे. याबाबत युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाचे सैनिक देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खारकीवमध्ये घुसले आहेत आणि रस्त्यांवर लढाई सुरू आहे. यात युक्रेनेचे मोठं नुकसान झाले आहे.