पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार

पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार

| Updated on: Mar 07, 2022 | 11:03 PM

रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाची मागणी होते आता युद्धामुळे काही देशांनी तेलाची मागणी थांबवली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. 

रशिया युक्रेनच्या युद्धानंतर बाजारपेठेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल डिझेलच्या दरात प्रचंड वाढणार आहे. कच्चा तेलाच्या बॅरेलचे दर वाढल्यामुळे भारतातील तेलाचे दर भडकणार असल्याचे मत जाणकारानी व्यक्त केले आहे. रशियाचे युक्रेनबरोबर युद्ध थांबले नाही तर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबरोबर सोन्याचे दरही गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात आता भारतात दीडशे रुपयांच्या बाहेर पेट्रोल दर जाण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात युद्धामुळे वाढ झाली असली तरी रशियाने जर आता युद्ध थांबवले नाही तर मात्र पेट्रोल डिझेलचे वाढते दरामुळे भारतातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाची मागणी होते आता युद्धामुळे काही देशांनी तेलाची मागणी थांबवली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.