भाजप टपूनच आहे, मतभेद गाडून एकदिलाने काम करणं गरजेचं; सामनातून पटोले-थोरात वादावर भाष्य
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादावर भाष्य करण्यात आलं आहे. पाहा...
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादावर भाष्य करण्यात आलं आहे. “राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे . पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते . संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे . अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे . पटोले – थोरात वाद चिघळू नये . टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा . पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत . फार काय बोलावे?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.