Saamana : ‘नीट’च्या दुकानदारीचा जाब स्वयंघोषित विश्वगुरूला द्यावाच लागेल, ‘सामना’तून कुणावर रोख?
नीटमधील दुकानदारीचा जाब स्वयंघोषित विश्वगुरूला द्यावाच लागेल, अशी खोचक टीकाही सामनातून करण्यात आली आहे. 'नीट परीक्षेत घोटाळा व प्रश्नपत्रिकांची खरेदी-विक्री सुरू होती तेव्हा देशातील सरकारी यंत्रणा झोपा काढीत होत्या काय?', असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
स्पर्धा परिक्षांचे पेपर फोडून आणि विकून आपण विश्वगुरू होणार आहोत काय? नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सामानाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. तर नीटमधील दुकानदारीचा जाब स्वयंघोषित विश्वगुरूला द्यावाच लागेल, अशी खोचक टीकाही सामनातून करण्यात आली आहे. ‘नीट परीक्षेत घोटाळा व प्रश्नपत्रिकांची खरेदी-विक्री सुरू होती तेव्हा देशातील सरकारी यंत्रणा झोपा काढीत होत्या काय?’, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. सीबीआय आणि ईडीसारख्या यंत्रणा फक्त विरोधकांना ब्लॅकमेल करण्यासाठीच सरकारने ठेवल्या आहेत? देशाला विश्वगुरू बनवण्याच्या बाता हे सरकार मारते; पण नीटसह सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फोडून व विकून आपण विश्वगुरु होणार आहोत काय? असा सवाल करत हल्लाबोल करण्यात आलाय. नीट परीक्षेत पैशांचा बाजार मांडून टॉपर्सचा बेसुमार पाऊस पाडण्यात आला. सीबीआय चौकशी होत राहील; पण नीटमधील या दुकानदारीचा जाब शिक्षणमंत्र्यांना व स्वयंघोषित विश्वगुरूलाही द्यावाच लागेल, असेही सामनातून म्हटले आहे.