Saamana on Narayan Rane : मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा... 'सामना'तून जिव्हारी लागणारी टीका

Saamana on Narayan Rane : मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा… ‘सामना’तून जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Jun 17, 2024 | 1:32 PM

'राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली, असं म्हणत सामनातून राणेंवर हल्लाबोल करण्यात आलाय. 'कोकणच्या जमिनी, उद्योग यावर परप्रांतीयांचा डोळा आहे. कोकणात विषारी प्रकल्प येत आहेत. त्यावर राणे यांनी बोलायला हवे. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही'

मनुष्य विजयाने नम्र होतो, पण राणे हिंस्त्र आणि बेफाम होतात, असं समानातून म्हटलं आहे. कोकणातून शिवसेना संपवली, भाजप नेते आणि नवनिर्वाचित खासदार यांनी केलेल्या टीकेवर सामनातून पलटवार करण्यात आला आहे. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली, असं म्हणत सामनातून राणेंवर हल्लाबोल करण्यात आलाय. ‘कोकणच्या जमिनी, उद्योग यावर परप्रांतीयांचा डोळा आहे. कोकणात विषारी प्रकल्प येत आहेत. त्यावर राणे यांनी बोलायला हवे. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही. चौथ्यांदाही पराभव होईल. मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात. मोदी-फडणवीस-शहांचे तसेच झाले होते. महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला’, असा घणाघातही सामनातून करण्यात आलाय तर मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे, अशी जिव्हारी लागणारी टीकाही राणेंवर करण्यात आली आहे.

Published on: Jun 17, 2024 01:32 PM