Saamana Editorial : ‘नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?’ कामराचं ‘ते’ गाणं अन् ‘सामना’तून सरकारला डिवचलं
कामरा प्रकरणात एकनाथ शिंदे पुरते बदनाम झाले असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. तर शिंदेंच्या होणाऱ्या चेष्टेची भाजप आणि देवेंद्र फडणवीस मजा घेत असल्याचे म्हणत सामनातून निशाणा साधला आहे.
स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराच्या गाण्याच्या मुद्द्यावरून सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून सरकारला पुन्हा डिवचण्यात आलं आहे. कुणाल कामराचं गाणं पुन्हा सामना अग्रलेखामध्ये छापत एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना देखील डिवचण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. जुन्या दारूची नशा या मथळ्याखाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्रात चाळीस आमदारांनी गद्दारी केली व एक घटनाबाह्य सरकार बनवले. त्यावर प्रचारात राळ उठली. सुप्रीम कोर्टबाजी झाली. खोक्यांवरच्या घोषणा गाजल्या. कुणाल कामराने विडंबन गाण्यात हेच सांगितले. त्यामुळे त्यात नवीन काय? नव्या बाटलीत जुनीच दारू आहे. त्या जुन्या दारूची नशा शिंदेंच्या लोकांना अशी चढली की, त्यांनी कामराच्या स्टुडिओवर हल्ला केला, असं म्हटलंय. इतकंच नाहीतर कामरा प्रकरणात शिंदे हे पुरते बदनाम झाले. शिंदे म्हणजे महाराष्ट्रात चेष्टेचा विषय बनला आहे. भाजप आणि फडणवीस मजा घेत आहेत. या चेष्टेखोरीत महाराष्ट्रही हास्यास्पद ठरला, हे बरे नाही, असं म्हणत सामनातून सरकावर खोचक टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
