Saamana : फडणवीस-शिंदे सरकार है बेलगाम सत्ताकारणाचे जिवंत उदाहरण, शिवसेनेच्या मुखपत्रातून टीकास्त्र
सोमवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आता विशेष खंडपीठासमोर महाराष्ट्रातील राजकीय पेच सुनावणीस येणार आहे. त्यानंतर याप्रकरणी पुढील नेमका काय निर्णय होतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या सगळ्याला नेमका किती वेळ जाईल, हे काही स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई : घटनात्मक पेचावर लक्ष वेधताना आता याप्रकरणी तातडीनं निकाल लावणं गरजेचं असल्याचं मत सामना (Saamana) अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं. तसंच फडणवीस-शिंदे सरकार है बेलगाम सत्ताकारणाचे जिवंत उदाहरण आहे, असं म्हणत निशाणा साधण्यात आलाय. शिवसेनेचं (Shiv sena News) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर (Eknath Shinde – Devendra Fadnavis Government) टीका करण्यात आली आहे. यासोबत न्याय मरणार नाही, न्याय होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. आज होणारा सुप्रीम कोर्टातील (Supreme Court of Maharashtra Politics) निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आता फैसला कधीही झाला, तरी विजय सत्याचाच होईल, अशी खात्री महाराष्ट्राच्या जनतेला असल्याचंही सामना अग्रलेखात म्हटलंय. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीरपणे लादले गेल्याची टीकाही करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांनाही अग्रलेखातून टोला लगावण्यात आला आहे.