Saamana : ‘आम्ही कसे हरलो?’ निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, ‘सामना’तून थेट आकडेच प्रसिद्ध
मतदानाची टक्केवारी प्रत्यक्षात घटली पण आकडे फुगवून सांगतिले आणि मतदानाची टक्केवारी साधारण ६० टक्क्यांच्या आसपास आहे, असा दावाही सामनातून करण्यात आलाय. विधानसभेचे महाराष्ट्रातील निकाल रहस्यमय आहेत.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आलाचा दावा सामना वृत्तपत्रातील रोखठोकमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. अनेक लोकांना विधानसभेच्या निकालाचे आश्चर्य आणि रहस्यच वाटत असल्याचे सामनात म्हटले आहे. मतदानाची टक्केवारी प्रत्यक्षात घटली पण आकडे फुगवून सांगतिले आणि मतदानाची टक्केवारी साधारण ६० टक्क्यांच्या आसपास आहे, असा दावाही सामनातून करण्यात आलाय. विधानसभेचे महाराष्ट्रातील निकाल रहस्यमय आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मतदानाचा पॅटर्न असा काय बदलला की निकालाची दिशाच फिरली. जमिनीवरचे चित्र पूर्ण वेगळे होते. तरीही निकालात ते आढळले नाही. निकालानंतर एक तातडीचे सर्वेक्षण एका प्रतिष्ठीत संस्थेकडून करण्यात आले आहे. त्यातून बाहेर आलेले सत्य चक्रावणारे असल्याचे सामनाच्या रोखठोक या सदरातून म्हटले आहे. निकालानंतर खासगी संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार कोणत्या पक्षाला मतदान केलं याचं उत्तर जनतेने दिलंय. यानुसार, भाजप २४.८ टक्के, काँग्रेस १४.६ टक्के, शिवसेना ठाकरे गटाला १३.४ टक्के, शिवसेना शिंदे गट ११. २ टक्के, राष्ट्रवादी ६. ५ टक्के आणि शरद पवार गट १२. ५ टक्के लोकांनी मतदान केल्याचं लोकं सांगताय.