नीलम गोऱ्हे अन् मनीषा कायंदे निलंबित होणार? सचिन अहिर काय म्हणाले?

नीलम गोऱ्हे अन् मनीषा कायंदे निलंबित होणार? सचिन अहिर काय म्हणाले?

| Updated on: Jul 22, 2023 | 8:53 AM

ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. परंतु ठाकरे यांना धक्का देत तालिका सभापती यांनी नीलम गोऱ्हे यांना दिलासा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 22 जुलै 2023 | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. परंतु ठाकरे यांना धक्का देत तालिका सभापती यांनी नीलम गोऱ्हे यांना दिलासा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तालिका सभापती यांनी जरी निर्णय दिला असला तरी आमची बैठक होणार आहे. सोमवारी-मंगळवारी आम्ही सर्व गटनेते बसून यावर चर्चा करणार आहोत आणि आमची रणनिती ठरवणार आहोत.

Published on: Jul 22, 2023 08:53 AM