आदित्य ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार भाजपच्या वाटेवर? नेमकं प्रकरण काय?

आदित्य ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार भाजपच्या वाटेवर? नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jul 19, 2023 | 1:21 PM

मंगळवारी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत बोलताना एक भविष्यवाणी केली. शिवसेना नेते सचिन अहिर लवकरच भाजपमध्ये दिसतील, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | मंगळवारी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत बोलताना एक भविष्यवाणी केली. शिवसेना नेते सचिन अहिर लवकरच भाजपमध्ये दिसतील, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सुधीर मुनगंटीवार यांचं माझ्यावर प्रेम आहे. हेच प्रेम त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदार हंसराज अहिर यांच्यावर दाखवावं.”

Published on: Jul 19, 2023 01:21 PM