एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा गोपीचंद पडळकर अन् गुणरत्न सदावर्ते यांच्या नादी लागू नये, कुणी दिला सल्ला?
गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी उद्यापासून आंदोलन करणार आहेत. यावरून राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य करत एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पडळकर आणि सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलाय
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी उद्यापासून आंदोलन करणार आहेत. यावरून राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य करत एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटी कर्मचाऱ्यांचा खोटा पुळका आला होता त्यामुळे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. परंतु ह्या दोघांनी केलेले आंदोलन हे लांबल्याचा आरोप आता एसटी कर्मचारी करतायत. दोन वर्षांपूर्वी केलेल्या त्या आंदोलनामुळे राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांसह राज्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता परत एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची हाक दिली आहे. परत एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे पडळकर आणि सदावर्ते एका माळ्याचे मणी आहेत या लोकांच्या नादी एसटी कर्मचाऱ्यांनी लागू नये, असे आवाहन सचिन खऱात यांनी केले.