Maratha Reservation : राज्यभर तीव्र आंदोलनं तरीही राज ठाकरे गप्प? कुणाचा थेट सवाल?

Maratha Reservation : राज्यभर तीव्र आंदोलनं तरीही राज ठाकरे गप्प? कुणाचा थेट सवाल?

| Updated on: Oct 31, 2023 | 1:15 PM

Sachin Kharat On Raj Thackeray : आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सचिन खरात यांनी भाष्य करत राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते कित्येक दिवसापासून राज्यभर आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसले होते. तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना मी मुख्यमंत्री यासंदर्भात बोलेन असे आश्वासन दिले होते. परंतु यानंतर राज ठाकरे यांनी या मराठा आरक्षण विषयावर साधा ब्र सुद्धा शब्द उच्चारला नाही, त्यामुळे राज ठाकरे मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन होत असताना आपण गप्प का? असा सवाल सचिन खरात यांनी राज ठाकरेंना केला असून गप्प राहण्याचे कारण मराठा समाजाला सांगावे, असेही ते म्हणाले.

Published on: Oct 31, 2023 01:15 PM