Sachin Vaze Case | वसुली प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप उजेडात
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील अशी देखील नावं आहेत. विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील अशी देखील नावं आहेत. विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांनी तक्रारीत परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे”, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे.
Latest Videos