Sachin wajhe : सचिन वाझेचा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल

Sachin wajhe : सचिन वाझेचा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल

| Updated on: Jun 07, 2022 | 4:03 PM

महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणी तुरुंगात आहेत. वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे.

मुंबई – 100 कोटी कथित वसुली प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे(Sachin wajhe ) तुरुंगात आहे. सचिन वाझेने आता न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सचिन वाझेने विशेष सीबीआय कोर्टामध्ये(CBI Court) जमीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर येत्या 20  जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणी तुरुंगात आहेत. वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे. सचिन वाझे 1990  मध्ये मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर अर्थात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले.  त्यांच्या कामाच्या आक्रमक पद्धतीमुळे ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून अल्पावधीत चर्चेत आले. मात्र वसुली प्रकरणी तुरुंगात आहेत.

 

Published on: Jun 07, 2022 04:03 PM