Sadabhau khot : शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत म्हणाले, ‘ही गावगाड्याची भाषा पण…’

‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ शरद पवारांच्या आजाराबाबात असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी जतमधील एका सभेत केलं. यानंतर शरद पवारांचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत. तर चारही बाजूंनी सदाभाऊ खोतांना घेरलं गेल्यानंतर सदाभाऊ खोत नरमल्याचे पाहायला मिळाले.

Sadabhau khot : शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत म्हणाले,  'ही गावगाड्याची भाषा पण...'
| Updated on: Nov 07, 2024 | 12:51 PM

‘माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दांचा अर्थाचा विपर्यास केला’, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिली. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या गावगाड्याची भाषेमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माझे ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.’ जतमधील सभेतील वक्तव्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊ खोत नरमल्याचे पाहायला मिळाले. तर ‘ही गावगाड्याची भाषा आहे. एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागली की आम्ही त्याला म्हणतो जा आरशात जाऊन बघ जा… गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रूजावं लागतं, त्याच मातीत राबावं लागतं आणि त्या मातीतच मरावं लागतं. त्यावेळी मातीची आणि गावगाड्याची भाषा समजते’, असं सदाभाऊ खोत म्हणालेत. जतमधील एका सभेत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र आपली भाषा ग्रामीण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow us
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.
खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'.
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड.
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.