गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून…, सदाभाऊंच्या ईडीवरील विधानाची चर्चा
मी देवेंद्र फडणवीसांना मानतो, असं म्हणत ईडीचा वेग आणखी वाढवला पाहिजे... जे आपल्याकडे आले नाहीत ते घाबरून मेलाच पाहिजे, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. शिंदे आणि अजित पवार यांच्या नेत्यांमागे ईडी लावून भाजपने पक्ष फोडल्याचा आरोप विरोधकांचा आहे.
सदाभाऊ खोत यांनी ईडीसंदर्भात केलेल्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मी देवेंद्र फडणवीसांना मानतो, असं म्हणत ईडीचा वेग आणखी वाढवला पाहिजे… जे आपल्याकडे आले नाहीत ते घाबरून मेलाच पाहिजे, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. शिंदे आणि अजित पवार यांच्या नेत्यांमागे ईडी लावून भाजपने पक्ष फोडल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, हे फडणवीसांचं वक्तव्य देखील चर्चेत राहिलं आहे. त्याच सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. ईडीवरून अशा प्रकारचं विधान करणारे सदाभाऊ खोत हे पहिलेच नाहीत. यापूर्वी भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे अशी विधानं केली आहेत. मविआच्या काळात ठाकरेंसोबत असलेल्या प्रतापराव सरनाईकांनी थेट उद्धव ठाकरेंना भाजपसोबत चला, याउद्देशाने लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली होती. काय होतं ते पत्र? बघा स्पेशल रिपोर्ट