Sadabhau Khot | प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार, सदाभाऊ खोत आरोप
नांदेडमध्ये पंचायत राज समितीच्या दौऱ्यात आरोग्य विभागाची धक्कादायक उधळपट्टी उघडकीस आलीय. पीआरसीच्या या दौऱ्यात शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी लोहा कंधार आणि मुखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या केंद्राची पाहणी केली.
नांदेडमध्ये पंचायत राज समितीच्या दौऱ्यात आरोग्य विभागाची धक्कादायक उधळपट्टी उघडकीस आलीय. पीआरसीच्या या दौऱ्यात शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी लोहा कंधार आणि मुखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या केंद्राची पाहणी केली. या पाहणीत जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्राच्या कामात केलेल्या भ्रष्टाचार सदाभाऊंनी उघड केलाय.
या प्रकारावर त्यांनी कडक शब्दात निषेध नोंदवत या भ्रष्टाचाराला जवाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याच्या तक्रारी अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता पंचायत राज समितीने स्वतःच कामाची पाहणी केलीय, त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले आहे