‘राजू शेट्टी म्हणजे तो मी नव्हेच’, रविकांत तुपकर यांच्यावरून शेट्टी यांच्यावर कोणी केली टीका

‘राजू शेट्टी म्हणजे तो मी नव्हेच’, रविकांत तुपकर यांच्यावरून शेट्टी यांच्यावर कोणी केली टीका

| Updated on: Aug 08, 2023 | 12:55 PM

तर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यावरून आता वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत.

पुणे, 8 ऑगस्ट 2023 । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर थेट आरोप केले होते. तसेच त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. तर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यावरून आता वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. यावरूनच शेतकरी संघटनेचे माजी नेते तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी खोत यांनी ही संघटना वाढविण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेत. मात्र आता तुपकर यांना बाजूला केलं जात आहे. त्यामुळे ही शिस्तपालन समिती नव्हे हि तर बेशिस्तपालन समिती आहे. तर राजू शेट्टी म्हणजे तो मी नव्हेच असे वागतात अशी टीका खोतांनी शेट्टींवर केलीय.

Published on: Aug 08, 2023 12:55 PM