VIDEO : गोपीचंद पडळकर यांची बैलगाडा शर्यत जिंकणारी सागर-सुंदरची जोडी पाहाच!
पोलिस आणि प्रशासनाची परवानगी नसतानाही ही बैलगाडा शर्यत पार पडली. पाच बैलजोड्यांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत सागर सुंदरने शर्यतीचं मैदान मारुन 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं. बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. पण तरीही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित होतं. पोलिसांनी आम्हाला चार ठिकाणी अडवलं. पण आम्ही इथे आलोच, असं बैलगाडा मालकाने सांगितलं
सांगली : भाजप आमदार गोपीचंद यांच्या बैलगाडा शर्यतीचं मैदान ‘सागर-सुंदर’ या बैलजोडीने मारलं आहे. पोलिसांना गुंगारा देऊन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवून पडळकरांनी बंदी असूनही बैलगाडा शर्यत भरवली. झरे गावात ठरलेल्या मैदानाऐवजी दुसरं मैदान बनवून पहाटे पाच वाजता ही स्पर्धा घेण्यात आली. पोलिस आणि प्रशासनाची परवानगी नसतानाही ही बैलगाडा शर्यत पार पडली. पाच बैलजोड्यांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत सागर सुंदरने शर्यतीचं मैदान मारुन 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं.
Latest Videos