Saif Ali Khan Attack Video : सैफची प्रकृती सध्या कशी? ‘लिलावती’कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूने जोरदार हल्ला केला. चोराकडून सैफ अली खानवर सहा वार...
अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री साडेतीन वाजता चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली. सुरूवातीला चोराने घरातील नोकरासोबत वाद घातला. या वादाचा आवाज ऐकून सैफ झोपेतून उठला आणि चोरासा पकडण्याच प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने तब्बल सहा वार केले. यामध्ये सैफला दोन गंभीर जखमा आणि मणक्याजवळ एक गंभीर घाव झाल्याचे समोर आले आहे. चोराकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आलं. डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, सैफ अली खानवरील उपचाराबाबत लिलावती रूग्णालयाकडून निवेदन जारी करण्यात आलंय. यामध्ये सैफ अली खानचं ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याती प्रकृती आता स्थिर आहे. सैफला आज संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचेही समोर येत आहे.