सदावर्ते यांना अटक करा अन् चितावणीखोर वक्तव्यामागील चाणक्याचा शोध घ्या, कुणाची आक्रमक मागणी?

सदावर्ते यांना अटक करा अन् चितावणीखोर वक्तव्यामागील चाणक्याचा शोध घ्या, कुणाची आक्रमक मागणी?

| Updated on: Oct 29, 2023 | 5:50 PM

VIDEO | सकल मराठा समाज आणि मराठा सेवा संघाने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करून ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा आणि चितावणीखोर विधानामागील चाणक्याचा शोध घ्यावा, मागणी केली आहे.

ठाणे, २९ ऑक्टोबर २०२३ | सकल मराठा समाज आणि मराठा सेवा संघाने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करून ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाचा शांततापूर्व आंदोलन सुरू असतानाही मराठा आरक्षणाला विरोध करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने गुणरत्न सदावर्ते हे बेताल आणि चितावणीखोर वक्तव्य करत आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या विधानांमुळे सामाजिक द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि सखोल चौकशी करून त्यांच्या चितावणीखोर विधानामागील चाणक्याचा शोध घ्यावा, अशी मागणी सकल मराठा समाज आणि मराठा सेवा संघाने पत्राद्वारे केली आहे.

Published on: Oct 29, 2023 05:50 PM