बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचं कनेक्शन? ‘जो सलमान खान और दाऊद की हेल्प करेगा…’,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकींच्या हत्येमागे सलमान खानवर झालेल्या हल्ल्याचं काही कनेक्शन आहे का? लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने भावाचा बदला घेतल्याची पोस्ट का केली? गुजरातच्या जेलमध्ये बसलेल्या बिश्नोईची टोळी हरियाणातल्या जेलमध्ये कट रचते. उत्तर प्रदेशचे शूटर निवडले जातात आणि महाराष्ट्रात एका नेत्याची हत्या होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे लाँरेन्स बिश्नोई गँग असल्याचं बोललं जातंय. त्याचं कनेक्शन थेट अकोल्यातल्या शुभम लोणकरच्या एका फेसबूक पोस्टसोबत जुळतंय. सिद्धीकींवर एकामागोमाग ३ गोळ्या झाडून हत्येमागे ३ वेगवेगळ्या कारणांची चर्चा आहे. कारण ठरतेय ही पोस्ट. शुबू लोणकर नावाच्या व्यक्तीनं ही पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये नेमकं म्हटलंय, “ओम् जय श्री राम….भारत जीवन का मूल समजता हूं… जिस्म और धन को में धूल समजता हुं…. किया वही सत्कर्म था जो, निभाया मित्रता का धर्म था जो… सलमान खान, हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमरे भाई का नुकसान करवाया. आज जो बाबा सिद्दीके के शराफत के पूल बांध रहै हे, वहीं एक टाईम में दाऊद के साथ मकोका एक्ट में था. इस के मरने का कारण अनुज थापन और दाऊद को बॉलिवूड, राजनीती, प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था. हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं, पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना. हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाएगा, तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे. हम ने पहले वार कभी नहीं किया”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. शुभू लोणकर आणि अनुज थापन नेमकं कोण आहेत? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट