Salman Khan Death Threat : सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सलमानच्या जिवलग मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे.
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रूमला सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. तर सलमान खानला धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून २ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तींचा पोलीस तपास सुरू आहे. सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. इतकंच नाहीतर हे पैसे दिले नाहीतर सलमान खानला जीवे मारू असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात 354 (2) आणि 308 (4) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच सलमान खानला धमकी देणारा मेसेज ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मिळाला होता. त्यावेळी सलमान खानकडून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा ही मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला होता.