सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्याभरापूर्वीच? भारतात नाही तर इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट एक महिन्याभरापूर्वीच रचण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली तर हा कट भारतात नाही तर अमेरिकेत रचला गेला. रविवारी पहाटे ४.५० वाजता बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे दोन हल्लाखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट एक महिन्याभरापूर्वीच रचण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली तर हा कट भारतात नाही तर अमेरिकेत रचला गेला. रविवारी पहाटे ४.५० वाजता बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. अनमोल बिश्नोई याने फायरिंगची जबाबदारी रोहित गोदारा याच्याकडे सोपवली होती. गोदारा याच्याकडे 12 पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर्स असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.