MSEB कर्मचाऱ्याला सलाम, 25 गावं 36 तासांपासून अंधारात अन् त्यानं 3 तास पाण्यात उभं राहून वीज पुरवठा केला सुरळीत

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. त्यात कशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना या पुराचा फटका बसला आहे, यामुळे या परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासापासून खंडित झाला होता.

MSEB कर्मचाऱ्याला सलाम, 25 गावं 36 तासांपासून अंधारात अन् त्यानं 3 तास पाण्यात उभं राहून वीज पुरवठा केला सुरळीत
| Updated on: Jul 24, 2024 | 4:23 PM

सरकारी काम आणि घडीभर थांब… याची प्रचिती सर्वसामान्य जनतेला असते. त्यातच दोन दिवसापासून बंद असलेला विद्युत पुरवठा कोण दुरुस्त करणार तेही भर पावसात… त्यातच विद्युत खांब पाण्याच्या वेढ्यात… पण विद्युत विभागचे कर्मचारी शेवटी धावून आले. गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. त्यात कशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना या पुराचा फटका बसला आहे, यामुळे या परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासापासून खंडित झाला होता. मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या आणि दोरीच्या सहाय्याने तूडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढली आणि ते विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत पोहोचले. पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवीत वीज पुरवठा सुरळीत केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे.

Follow us
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?.
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज.
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले.
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?.
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?.
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’.
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?.