‘इस्लाम धर्म हाच हिंदुस्तानचा खरा शत्रू’, Sambhaji Bhide यांचं वादग्रस्त विधान
आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं त्यांनी वक्तव्य केल्यानं भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.
पुणे : आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं त्यांनी वक्तव्य केल्यानं भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना संभाजी भिडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर (Shirur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याच वेळी संभाजी भिडे यांनी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या नव्या वक्तव्यानं वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.