महिलांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानं पुन्हा वादाच्या भोवऱ्यात… संभाजी भिडे यांचं करायचं काय?
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. पुण्यात दाखल झाल्यानंतर भीडे गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार होते. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं.
आपल्या वादग्रस्त विधानासाठी अवघ्या महाराष्ट्रात परिचित असलेले शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्याला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र हे दळभद्री होतं, असं म्हणत त्यांनी तिरंग्याला विरोधी सूर लावलाय. ‘आपल्या जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे’, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. इतकंच नाहीतर संभाजी भिडेंनी वटसावित्रीच्या पुजेबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. पुण्यात दाखल झाल्यानंतर भीडे गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार होते. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.