संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 'महामूर्ख जमात हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन् नवरात्रोत्सव XXX'

संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, ‘महामूर्ख जमात हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन् नवरात्रोत्सव XXX’

| Updated on: Oct 03, 2024 | 1:59 PM

नवरात्रौत्सवानिमित्त सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडला आजपासून सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे यांनी या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण-उत्सवावर जोरदार टीका केली आहे.

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला गांडूपणाकडे घेऊन चालला आहे. हे सर्व नाही चालणार नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही” असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘काही माता-भगिनी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. नवरात्र उत्सवात सर्व कार्यक्रम करमणूक हे सर्व सध्या सुरू आहे. जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणं केली. ते आता पाठलाग करतायत, हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू-मुस्लिम भाई-भाई, हिंदुंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात आहे’, तर राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 03, 2024 01:59 PM