Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अॅक्शन मोडवर
Sangli Municipal Corporation : सांगलीमध्ये काल संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासन झोपेतून जागं झालं आहे. शहरातील भटके कुत्रे पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे.
सांगली महापालिकेकडून शहरात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर महापालिका प्रशासन आता खडबडून जागं झालं असलेलं बघायला मिळत आहे. संभाजी भिडे यांना सांगली शहरातील माळी गल्लीत कुत्रा चावल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता प्रशासन अॅक्शन मोडवर आलेलं असून् शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी डॉग व्हॅन फिरत असल्याचं बघायला मिळालं आहे.
सांगली शहरातल्या माळी गल्लीमध्ये काल रात्री संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतला. अचानक कुत्र्याने हल्ला केल्याने भिडे गुरुजींच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर आज सकाळी महापालिका प्रशासनाला जग आली आहे. त्यानंतर आता संपूर्ण शहरात भटके कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. या पूर्वी अनेक सामान्य नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. मात्र तरीही पालिकेने कोणतीही कारवाई इतके दिवस केलेली नव्हती. मात्र संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यावर जेवढ्या तत्परतेने पालिका प्रशासन कुत्र्यांना पकडत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
