महात्मा गांधी यांच्यावर अक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत सांगलीत जंगी स्वागत

महात्मा गांधी यांच्यावर अक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत सांगलीत जंगी स्वागत

| Updated on: Aug 02, 2023 | 8:49 AM

तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्या अटकेच्या मागणी लावून धरली आहे. एकीकडे अमरावतीत आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून आंदोलनात भिडे यांचा समाचार घेतला जात असतानाच सांगलीत भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात येत होता.

सांगली, 02 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अमरावती, यवतमाळ येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात सध्या जोरदार आंदोलने होताना दिसत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्या अटकेच्या मागणी लावून धरली आहे. एकीकडे अमरावतीत आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून आंदोलनात भिडे यांचा समाचार घेतला जात असतानाच सांगलीत भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात येत होता. त्यानंतर आता भिडे यांचे सांगलीत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. विदर्भ-मराठवाडा दौरा संपवून भिडे सांगलीत आल्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. यावेळी त्यांचे औक्षण करत मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Published on: Aug 02, 2023 08:49 AM