Sambhajiraje UNCUT PC | “छत्रपतींनी मराठा समाजाला दिशा दिली, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही”
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली.
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना मराठा समाजाला दिशा दिली. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असे संभाजी छत्रपती म्हणाले.
तसेच यावेळी बोलाताना त्यांनी उदयनराजे भोसले आणि माझ्यात सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर आमचे एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाहीये, असेही संभाजी छत्रपती म्हणाले.
Latest Videos