Sambhaji Raje | 'मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं पण.....' - संभाजी राजे

Sambhaji Raje | ‘मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं पण…..’ – संभाजी राजे

| Updated on: Sep 25, 2021 | 2:28 PM

आघाडी सरकारकडून मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने खासदार संभाजी छत्रपती वैतागले आहेत. संभाजी छत्रपती यांनी पहिल्यांदाच ठाकरे सरकारला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांच्या या आक्रमक पवित्र्यावर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

खासदार संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. राज्य सरकारने मला उपोषणाला मागे पडायला भाग पाडू नये. तात्काळ मराठा आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा मी आझाद मैदानावर उपोषणाला बसायला केव्हाही तयार आहे, अशा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला आहे.