Imtiyaz Jalil यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे सांगावं…’
VIDEO | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून शासनाकडून विविध कार्यक्रमांचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन, कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इम्तियाज जलील यांची हजेरी अन्...
छत्रपती संभाजीनगर, १७ सप्टेंबर २०२३ | मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आज महोत्सवी वर्ष आहे. गेल्या दोन दिवसांपासून शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन हे छत्रपती संभाजीनगर याठिकाणी करण्यात येत आहे. मात्र काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीदरम्यान, आदर्श सहकारी पथसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक झाल्यासंदर्भात संपूर्ण ठेवीदारांकडून आंदोलन करण्यात आलं होते. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इम्तियाज जलील यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत, पण आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिकपणे सांगावं की, मराठवाड्याला न्याय मिळाला आहे का?’, असे म्हणत जलील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.