‘मरुद्या जेवढे लोकं मरतील तेवढे’, संभाजीनगर राडा प्रकरणी शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राडा प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद, कुणाचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण सध्या तापलेलं बघायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दोन गटातील राड्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांनी आपलं मत व्यक्त करताना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत आरोप केले आहे. “या शहराविषयी जी संशयास्पद भूमिका झालेली आहे ती खूप गंभीर आहे. रामनवमीच्या दिवशी दंगल घडत होती तेव्हा फक्त 15 पोलीस राम मंदिरात होते. त्यांची जबाबदारी राम मंदिराची सुरक्षा करायची आणि समाजकंटकांपासून परिस्थिती हातळण्याची जबाबदारी होती. तुम्ही मला उत्तर द्या तेव्हा शहरातील पोलीस कुठे होते? सीसीटीव्ही ते दाखवा”, असं आव्हान जलील यांनी दिलं. तर “पोलिसांनी आज सभेला परवानगी दिली होती. मग पोलिसांनी कोणत्या आधारावर भाजपला सावरकर गौरव यात्रा काढण्याची परवानगी दिली? तुमचा उद्देश काय आहे? दबाव कुणावर आहे? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं होतं का, की मरुद्या जेवढे लोकं मरतील तेवढे. काय व्हायचं ते होऊ द्या. पण आमच्या लोकांना घाणेरडं राजकारण करण्याची परवानगी द्या. सावरकरांची आज पुण्यातिथी आहे की जयंती आहे?”, असा सवाल त्यांनी केला आहे.