Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार
संभाजीराजे छत्रपती शनिवारी कोपर्डीत येणार आहेत. यावेळी ते कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर संभाजीराजे यांच्याकडून मराठा आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. साधारण दुपारी दोनच्या सुमारास संभाजीराजे कोपर्डीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.| Sambhaji Raje Chhatrapati Visit Kopardi Today
संभाजीराजे छत्रपती शनिवारी कोपर्डीत येणार आहेत. यावेळी ते कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर संभाजीराजे यांच्याकडून मराठा आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. साधारण दुपारी दोनच्या सुमारास संभाजीराजे कोपर्डीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. कोल्हापुरात 16 जूनला हा मोर्चा निघेल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता संभाजीराजे पुण्यातून लाँग मार्च काढण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे 16 जून रोजीच्या कोल्हापुरातील मोर्चावर अनिश्चिततेचे सावट आहे. | Sambhaji Raje Chhatrapati Visit Kopardi Today
Latest Videos