Sambhaji Raje : जरांगे पाटील यांना संभाजीराजे यांचा फोन अन् केली विनंती, म्हणाले…
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत जात आहे. अशातच छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगेंना फोन करून तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करत पाणी प्या, अशी विनंतीही केली.
मुंबई, २९ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवत जात आहे. अशातच छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगेंना फोन करून तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करत पाणी प्या, अशी विनंतीही केली. ते म्हणाले, माझा शब्दाचा मान ठेवून पाणी प्यायलात. असं सारखं सारखं सांगणं चुकीचे आहे. पण तुमची तब्येत चांगलं असणं समाजासाठी महत्वाचं आहे. तुम्ही पाणी प्यायलाचं हवं. आज मी तुम्हाला विनंती करणार नाही. पण तुम्हाला जर समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुमची तब्येत चांगली असणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही कृपया पाणी प्यावं, असं मला वाटतंय. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचाय. तुम्ही मला लगेच निर्णय देऊ नका, असे छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगतिले. तुम्ही लढा उभा केलाय. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे, असे फोन वरून सांगून संभाजी राजे यांनी जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.