Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhajinagar : जेवणखावण, वेणीफणी..; कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

Sambhajinagar : जेवणखावण, वेणीफणी..; कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

| Updated on: Mar 27, 2025 | 7:40 PM

Sambhajinagar Collector Office : अतिक्रमण असलेल्या भागांवर तोडक कारवाई केल्याने संभाजीनागरच्या उघड्यावर संसार आलेल्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आपला संसार थाटुन आंदोलन सुरू केलं आहे.

छत्रपती संभाजीनागर मधील हर्सुल भागात असलेल्या गट क्रमांक 216 आणि 217 मधील अतिक्रमण महापालिकेने तोडक कारवाई करून काढलं आहे. त्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आमचं घर पडल्यावर आम्ही कुठे जायचं? असा प्रश्न उपस्थित करत आज या नागरिकांनी संभाजीनागर जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कुटुंबासह ठिय्या मांडला आहे. या ठिकाणी या सर्व कुटुंबांनी आपला संसार मांडून येथेच स्वयंपाक करत जेवण देखील केलं आहे. या प्रकारे आंदोलन करून या कुटुंबांनी शहरातील नागरिकांचं देखील लक्ष वेधून घेतलं. मात्र आता यावर प्रशासन काय निर्णय घेईल हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Published on: Mar 27, 2025 07:40 PM