म्हणून महाविकास आघाडीची सभा, शिवसेना नेत्यानं सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या सभेचं कारण

म्हणून महाविकास आघाडीची सभा, शिवसेना नेत्यानं सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या सभेचं कारण

| Updated on: Apr 01, 2023 | 2:51 PM

VIDEO | अडीच वर्ष कोणतंही काम केले नाही. अडीच वर्षांनंतर घराबाहेर निघाले तर टीकेशिवाय काय उत्तर देणार, कुणी केला उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. ही सभा होत नाहीतर त्यापूर्वीच विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याच्याआधी मविआची सभा ही सगळी कॉमेडी सभा असेल अशी टीका केली असताना आता संभाजीनंगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी देखील उद्धव ठाकरे अन् मविआच्या सभेवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीची होणारी सभा म्हणजे केवळ टीका करण्यासाठी होणार आहे. ते विकासाच्या मुद्दयांवर बोलू शकत नाही, फक्त सभेत टीका करणार म्हणून महाविकास आघाडीची सभा होतेय. अडीच वर्ष कोणतंही काम केले नाही. अडीच वर्षांनंतर घराबाहेर निघाले तर टीकेशिवाय काय उत्तर देणार, असे म्हणत संदीपान भुमरे यांनी खोचक टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Published on: Apr 01, 2023 02:48 PM