गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादानंतर संभाजीराजे छत्रपतींचा पाठिंबा; म्हणाले, “महिलांना स्वातंत्र्य…”
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावारून वाद निर्माण झाला आहे. काही संघटनांनी गौतमी पाटीलने पाटील आडनाव लावू नये अशी भूमिका घेतली आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावारून वाद निर्माण झाला आहे. काही संघटनांनी गौतमी पाटीलने पाटील आडनाव लावू नये अशी भूमिका घेतली आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “महिलांना स्वातंत्र्य आहे, महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखविले, महाराणी ताराराणी यांनी 7 वर्षे औरंगजेबाशी लढा दिला, तेव्हापासून महिला सबलीकरण सुरु झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, हे या मी मताचा आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.
Published on: May 29, 2023 11:16 AM
Latest Videos