Kranti Redkar | समीर केवळ कलाकारांना पकडत नाही – क्रांती रेडकर
समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत. ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. इतर अनेक गँगस्टर, ड्रग्स पेडलरलाही त्यांनी पकडलं आहे. ते कोणत्या पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत, असं मत क्रांती रेडकर यांनी व्यक्त केलंय.
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणाने आता वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोपही केला जातोय. या आरोपांना समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर, तसंच बहीण यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय.
समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत. ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. इतर अनेक गँगस्टर, ड्रग्स पेडलरलाही त्यांनी पकडलं आहे. ते कोणत्या पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत, असं मत क्रांती रेडकर यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर समीर वानखेडे यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लटकवू, जाळून टाकू, मारुन टाकू, अशा शब्दात आम्हाला धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे.