Yasmin Wankhede | यास्मिन वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
समीर वानखेडे यांच्या बहीण अॅड. यास्मिन वानखेडे यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यास्मिन यांनी मलिकांवर बदनामी केल्याचा आरोप केलाय. तत्पूर्वी यास्मिन वानखेडे यांनी काल पत्रकार परिषद घेत मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.

नवाब मलिक हे ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच आरोप करत आहेत. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.
मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचं मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावं सर्टिफिकेट, असं सांगतानाच आमचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचं सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचं सर्टिफिकेट कुणी काढलं आहे का? असा सवालही त्यांनी केला.