“मला आणि कुटुंबियांना गंभीर धमक्या, आम्हाला संरक्षण द्या”, समीर वानखेडे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

| Updated on: Aug 02, 2023 | 2:58 PM

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होतेय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात त्यांची चौकशी होतेय. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

मुंबई: एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होतेय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात त्यांची चौकशी होतेय. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला एक पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी आपल्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.वानखेडे यांच्यामार्फत दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात वानखेडे यांना धमकी देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून वानखेडे व त्यांच्या पत्नीला धमक्या येत असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Published on: May 23, 2023 11:55 AM
समीर वानखेडे यांच्यावरून नाना पटोले यांचा भाजपवर आरोप, तर फडणवीस म्हणतात, “नाना पटोले लादेनला भेटले होते”!
रेल्वे तिकीटाचा काळाबाजार; मनसे नेता आक्रमक, कोकण प्रवाशांना केले ‘हे’ आवाहन