आमच्या कुटुंबियांना बदनाम करतायेत, इज्जत, अब्रूवर टीका केली जातेय – Kranti Redkar
मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केलाय. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केलाय. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वानखेडे यांच्या कुटुंबियांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिलं आहे. राज्यपालांनी सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन दिल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितलं.
Latest Videos