Samruddhi Expressway Toll Hike : ‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
समृद्धी महामार्गावर १ एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना आता १९ टक्क्यांहून अधिक टोल भरावा लागणार आहे.
तुम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण आजपासून अर्थात १ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढले आहेत. समृद्धी महामार्गावरून प्रवास आजपासून महागला असून या महामार्गावरील टोल दरात १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, नागपूर ते मुंबई या ७०१ किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग सुरू आहे, येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच टोलमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कडून ही मोठी टोल वाढ करण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, मालकांमध्ये नाराजी दिसतेय.
‘समृद्धी’वरील प्रवासासाठी किती टोल?
वाहनांचा प्रकार | सध्याचे दर | नवे दर |
कार, हलकी मोटार | १०८० | १२८७ |
हलकी, व्यावसायिक, मिनी बस | १७४३ | २०७५ |
बस अथवा दोन आसांचा ट्रक | ३६५६ | ४३५६ |
तीन आसांची व्यावसायिक | ३९९० | ४७५० |
अवजड बांधकाम यंत्रसामुग्री | ५७४० | ६८३० |
अति अवजड वाहने | ६९८१ | ८३१२ |

मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा

'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
