Samruddhi expressway toll hike : ‘समृद्धी’वरून प्रवास करताय? 1 एप्रिलपासून 19% हून आधिक टोल, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
समृद्धी महामार्ग सुरू तेव्हा डिसेंबर २०२२ मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये पथकर आकारला होता.
समृद्धी महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण समृद्धी महामार्गावर १ एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना आता १९ टक्क्यांहून अधिक टोल भरावा लागणार आहे. नागपूर ते मुंबई या ७०१ किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग सुरू असून येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच टोलमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कडून ही मोठी टोल वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, MSRDC कडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील टोलवाढ ही पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू करण्यात आली आहे.
नागपूर ते इगतपुरीपर्यंतच्या प्रवासासाठी किती टोल?
वाहनांचा प्रकार | सध्याचे दर | नवे दर |
कार, हलकी मोटार | १०८० | १२९० |
हलकी, व्यावसायिक, मिनी बस | १७४५ | २०७५ |
बस अथवा दोन आसांचा ट्रक | ३६५५ | ४३५५ |
तीन आसांची व्यावसायिक | ३९९० | ४७५० |
अवजड बांधकाम यंत्रसामुग्री | ५७४० | ६८३० |
अति अवजड वाहने | ६९८० | ८३१५ |

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
